सध्या सर्वत्र राम मंदिराची चर्चा सुरू आहे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील लोकांना अयोध्यात होणारा राम मंदिर सोहळा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ज्या क्षणाची सर्वेजण अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे. येत्या २२ तारखेला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार असून संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे.
अयोध्यात होणाऱ्या ह्या सोहळ्यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणात्य सिनेसृष्टीसह देशातील कानाकोपऱ्यातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये कंगना राणावत ह्या अभिनेत्रीला देखील आमंत्रित केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक कलाकारांनी राम मंदिराच्या सोहळ्याआधीच अयोध्येत हजेरी देखील लावली आहे. बरीच कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियावरून अयोध्येतील तेथील सुंदर क्षण शेअर करताना दिसून येतात.
दरम्यान, शुक्रवारी रामलल्लाच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ही मूर्ती अरुण योगिराज यांनी घडवली आहे. ५१ इंचची ही मूर्ती काळ्या शाळिग्राम शिलेपासून बनवण्यात आली असून ह्या मूर्तीमधील प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे. राम मंदिरात स्थापनेसाठी तीन मूर्ती बनवण्यात आल्या असून त्यातील शिल्पकार अरुण योगिराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये ओम, गणेश, चक्र, शंख, गदा, स्वस्तिक यासह अनेक धार्मिक चिन्हे दिसतात. अयोध्या जन्मस्थळ असल्याने प्रभू श्रीरामांची बालमूर्ती असावी असं राम भक्तांच म्हणणं होतं.
अशातच अभिनेत्री कंगना राणावतने रामलल्लाची मूर्ती पाहून तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. व रामलल्लाची मूर्ती तयार करणाऱ्या अरुण योगिराज यांच देखील कौतुक केल. इंस्टाग्राम स्टोरीवर रामलल्लाच्या मूर्तीचे फोटो शेअर करत कंगना म्हणली की, “मला नेहमी वाटायचे की प्रभू राम लहान असताना असे दिसले असतील. आज या मूर्तीने माझी कल्पना जिवंत झाली. अरुण योगिराज तुम्हाला अनेक आशीर्वाद. कंगनाने पुढे लिहिले की, “किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. अरुण योगीराज यांच्यावर किती दबाव असेल. आणि परमेश्वराला पाषाणात सामावून घेणं ही खूप कठीण गोष्ट आहे. काय म्हणावं, ही देखील रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज श्री रामजींनी स्वतः तुम्हाला दर्शन दिले आहे… तुम्ही धन्य आहात.” अशी पोस्ट करत कंगनाने रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज यांचं कौतुक केलंय.
येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल.