बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांच्या जोडीला आदर्श जोडी म्हणून ओळखले जाते. ते दोघे बॉलिवूड मधील सर्वांचे आवडते कपल आहेत. त्यांची बॉलिवूड मधील सर्वात हिट जोडी आहे.
काजोलने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन १९९९ मध्ये अजय देवगण सोबत लग्न केले होते. त्यांचा लग्नाला २३ वर्ष झाले असून तिने घेतलेल्या निर्णयावर तिला अभिमान वाटतो लग्नाआधी या दोघांनी अनेकदा एकमेकांना डेट केलं होत. लग्नानंतर जरी तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल असल तरी सुद्धा ती सोशल मिडियावर सतत सक्रिय असते.
View this post on Instagram
काजोल आणि अजय देवगण ने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण त्या दोघांच्या जोडीपेक्षा बॉलीवूडमध्ये काजोल व शाहरुख यांच्या जोडीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. बाजीगर, कूच कुछ होता है, दिलवले दुल्हनिया ले जायेगे अश्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख व काजोल यांनी एकत्र काम केल आहे.
पण काही काळानंतर अजयने काजोलला शाहरुख सोबत काम करण्यास सक्त मनाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, “लोक काजोल आणि अजयच्या नात्याबद्दल कमी आणि काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीबद्दल जास्त बोलायचे. अजयला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने काजोलला शाहरुखबरोबर काम करण्यास मनाई केली होती.
शाहरुख खानला एका मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की अजयने काजोलला त्याच्या सोबत काम करण्यास मनाई केली आहे का, त्यावर शाहरुख म्हणालेला, “अजयने अशी कोणतीही अट घातली आहे की नाही हे मला माहीत नाही. अजयने तिला नकार दिल्याने काजोल माझ्यासोबत काम करणार नसेल, तर मी या निर्णयाचा आदर करेन. पण असे झाले आहे असे मला वाटत नाही. हे जरा विचित्र आहे. गौरी जर अभिनेत्री असती तर मी तिला कधीच सांगणार नाही की तुला कोणाबरोबर काम करायचे आहे आणि कोणाबरोबर नाही.
यादरम्यान काजोल, अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन व राजेश चड्ढा यांनी निर्मिती केलेल्या ‘द ट्रायल’ या वेब सिरिजमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.