दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा कोणी पाहिला नसेल क्वचितच काही प्रेक्षक असतील.
या सिनेमात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे या दोघांच्या जुगलबंदीमुळे हा सिनेमा हिट होणार यात काडीमात्रही शंका नव्हती. तसेच या सिनेमातील समंथा रूथ प्रभूचे आयटम सॉन्ग देखील तूफान हिट झाले होते. एकूणच काय तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला. या सिनेमाने भरतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या सिनेमातील डायलॉग देखील प्रचंड गाजले होते. त्यापैकी ‘झुकेगा नही साला’ हा डायलॉग प्रेक्षकांच्या डोक्यात आणि मनात एकदम फिट बसला.
या सिनेमातील कथानक, अॅक्शन, तसेच गाणी हे सगळंच जुळून आल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला उचलून धरले. तेव्हापासूनच या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच यावा अशी चाहत्यांची अपेक्षा होती. चाहत्यांची ही अपेक्षा आता पूर्ण होताना दिसत आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पाचा पुढील भाग म्हणजेच ‘पुष्पा २: द रूल’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा २ या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले. त्यातील अल्लूचा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.
पुष्पा २: द रूल सिनेमाच्या पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या लूकमधील अगदी बोटावर लावलेली नेलपॉलिश इतक्या छोट्या गोष्टींनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अल्लूच्या या लूकने प्रेक्षकांना अगदीच वेडं केलं आहे. चाहत्यांनी मेकर्सला हा सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित करावा असे आवाहन देखील केले. पुष्पा द रूल या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. तसेच अल्लू अर्जुन सोबत पुष्पा २ मध्ये देखील रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण पुष्पा २ मध्ये सामंथा रूथ प्रभू ही आयटम सॉन्ग करणार की नाही हे येत्या काळातच समजेल.
पुष्पा २ संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते आता प्रचंड उत्सुक आहेत. तर पुष्पा द रूल या आगामी सिनेमासाठी अल्लू अर्जुन मानधन घेणार नसल्याचे देखील समोर आले आहे. त्याने या सिनेमासाठी कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला आहे. तो फ्रीमध्ये या सिनेमात काम करणार आहे. असे असले तरी अल्लू अर्जुन कोट्यावधींची कमाई करणार आहे. पण ते कसे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर ते असे की, सिनेमाने केलेल्या एकूण कमाईतून ३३ टक्के हिस्सा अल्लू अर्जुन घेणार आहे. जर सिनेमाने १००० कोटींची कमाई केली तर त्यातील ३३ टक्के हिस्सा अल्लू अर्जुनला दिला जाणार आहे.
पुष्पा २ या सिनेमाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ३० कोटी रुपयांत विकत घेतले आहेत. त्याशिवाय या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्स देखील तीन पट अधिक रकमेत विकत घेणार आहे. त्यामुळे सध्या सर्वचजण पुष्पा २: द रूल या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.