रियालिटि शोच्या शर्यतीत बिग बॉस हा शो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा शो आहे. टेलेव्हिजनवरील बिग बॉसच्या दमदार यशानंतर बिग बॉस आता ओटीटीवर देखील प्रदर्शित होत आहे.
यापूर्वी बिग बॉस ओटीटीचे पहिले पर्व जबरदस्त पार पडले. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसरे पर्व देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यंदाच्या दमदार कलाकारांमुळे या पर्वात आणखीनच रंजकता आली आहे. तर नुकतंच या शोमधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांची आधीची पत्नी ‘आलिया सिद्दिकी’ बिग बॉसच्या घराबाहेर पडली. परंतू घराबाहेर पडताच तिने सलमान खान विरुद्ध खूप मोठे भाष्य केले आहे.
सलमान खान पक्षपात करत असल्याचा गंभीर आरोप आलियाने केला. तसेच सलमान नवाजुद्दीन सिद्दिकीला पाठिंबा देत आहे, असे मत देखील तिने मांडले. त्यामुळे घराबाहेर आल्यानंतर देखील तिचीच जोरदार चर्चा सुरु आहे. आलियाने नुकतीच मिडियाला एक मुलाखत दिली. तेव्हा ती म्हणाली की, “सलमान खान पूर्णपणे पक्षपाती होऊन बोलले. तिथे एका स्टारनं दुसऱ्या स्टारला पाठिंबा दिला होता. एखादी व्यक्ती आपली शक्ती इतर लोकांसाठी कशी वापरते, हे त्यावरून दिसून आलं. मला याबद्दल बोलायला अजिबात भीती वाटत नाही. कारण, मी चुकीची नाही हे मला माहीत आहे.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “प्रत्येक जण या शोमध्ये भूतकाळाविषयी बोलत आहे. पूजा भट्ट बोलत आहे. फलक आपला भाऊ आणि त्याच्या जेलविषयी बोलली आहे. माझं अभिषेकबरोबर चांगलं बॉण्ड होतं आणि तो माझ्याविषयी जाणून घेऊ इच्छित होता. मी कधी कोणाशी चुकीचं बोलली नाही.”
अभिनेत्री पूजा भट्टने देखील आलियावर एक आरोप केला होता की, “ती व्हिक्टिम कार्ड खेळत आहे.“ यादरम्यान आलियाने पूजा भट्टला देखील उत्तर दिले. आलिया म्हणाली की, “स्वतः वडील महेश भट्ट यांच्या नावाचा वापर करते. तिनं माझ्याविषयी खूप मोठं विधान केलं. पण जेव्हा मी माझा बचाव केला, तर, ती म्हणाली, ‘मी महेश भट्टची मुलगी आहे.’ पूजा भट्टला हे करण्याची काय गरज होती? ती स्वतः एक अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. एकेकाळी पूजा भट्ट एक स्टार राहिली आहे. ती आपल्या योग्यतेच्या आधारे का खेळत नाही?”
तर आता बिग बॉसच्या दुसऱ्याच आठवड्यापासून यंदाच्या ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शोची रंजकता आणखीनच वाढली आहे.