अबुधाबीमध्ये सुरु असणाऱ्या आयफा अवार्ड्साठी बॉलीवूडच्या सर्व सुपरस्टारने हजेरी लावली आहे. सर्व स्टार्सने आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क केले आहे. यामधले अनेक स्टार्सचे वेगवेगळे लूक सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. बॉलीवूडमध्ये सध्या एकापाठोपाठ एक पुरस्कार सोहळे धुमधडाक्यात सुरु आहेत. बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर व आयफा या पुरस्कारांना वेगळंच महत्त्व आहे.
या कार्यक्रमाच सूत्रसंचालन अमिताभ बच्चन व विकी कौशल यांनी केले आहे. रेड कार्पेटवर देखील अभिनेत्रींचे ग्लॅमरस लूक पाहायला मिळाले. आयफा या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वत्र आलिया भट्टच्या ‘गंगू बाई काठीयावडी’ची चर्चा सुरु होती. आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाला देखील बरेच पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाने फिल्मफेअर प्रमाणेच इकडे सुद्धा पुरस्कार मिळविला तर सर्व उत्कृष्ट अभिनेता म्हणून ह्रितिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाला हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. सर्वात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्टच्या ‘गंगू बाई काठीयावाडी’ला पुरस्कार देण्यात आला. तसेच अनिल कपूरच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाला सर्वत्कृष्ट सह्हायक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
यंदाचा आयफा २०२३ चा अतुलनीय योगदान पुरस्कार हा दिग्गज अभिनेते कमल हासन यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रधान करताना तिथे उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांनी त्यांना उभे राहून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याक्षणी सर्वेच जन भाऊक झाले होते.
यावर्षी मिळालेल्या सर्व पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
१. उत्कृष्ट चित्रपट : दृश्यम २
२. उत्कृष्ट दिग्दर्शक : आर माधवन (रॉकेट्री द नांबी इफेक्ट)
३. उल्लेखनीय कामगिरी प्रादेशिक चित्रपट : रितेश देशमुख दिग्दर्शित वेड
४. उत्कृष्ट पार्श्वगायिका : श्रेया घोषाल – रासिया (ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा)
५. उत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंग – केसरिया (ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा)
६. उत्कृष्ट छायाचित्रण, संवाद आणि पटकथा : गंगूबाई काठियावाडी
७. उत्कृष्ट संकलन : दृश्यम २
८. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : विक्रम वेधा
View this post on Instagram