सध्या सर्वत्रच लगीन सराई सुरु आहे. यात आपले लाडके कलाकारही आहेत. तर सध्या बाशिंग बांधून बसलेला नवरदेव म्हणजे लोकप्रिय क्रिकेटपटू केएल राहुल. राहुल आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
अथिया आणि राहुल हे चार वर्षांपासून एकमेकांना देट करत होते. आधी मैत्री नंतर प्रेम आणि आता लग्न या सुंदर टप्यावर आज ते येऊन पोहोचले आहेत. खूप दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती पण आज अखेर तो क्षण आला.
सुनील शेट्टी यांची मुलगी म्हणजेच अथिया आणि राहुल यांचा हा विवाहसोहळा सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यामधील फार्महाऊसवर होणार आहे. व्हायरल झालेल्या फोटोज् नुसार त्यांचा लग्नमंडप आणि लग्नाच्या विधींची तयारी ही जोरदार सुरु आहे. तसेच के एल राहुलचे मुंबईतील घरही विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
तर रविवारी सुनील शेट्टी हे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार आणि उद्या मी मुलांना घेऊन तुम्हां सर्वांसमोर नक्की येईल.” तसेच रविवारी अथिया आणि राहुल यांचं संगीत पार पडलं. परंतू यावेळी माध्यमांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नसली तरी फार्महाऊसच्या बाहेरुन काढलेले काही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत आणि संगीतमध्ये बॉलिवूडच्या जबदस्त गाण्यांचा समावेश झाला असल्याचे समजत आहे.
तर आज (२३ जानेवारी २०२३ रोजी) सायंकाळी ४ च्या सुमारास अथिया आणि राहुलचा लग्नगाठ बांधणार आहेत. हा सोहळा केवळ १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून लग्नानंतर लवकरच मुंबईमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे.