संपूर्ण सिनेसृष्टीला वेड लावलेली चंद्रा म्हणजेच अभिनेत्री Amruta Khanvilkar. अमृताने मराठी मालिका आणि विशेषतः चित्रपटांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपले नाव कोरले आहे.
अमृताच्या कामावर आणि तिच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. ती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे सोशल मीडियावर इतके चाहते आहेत की मराठी अभिनेत्रींपैकी सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीत ती पहिल्या पाचमध्ये आहे. तर इंस्टाग्रामवर तिचे तब्बल ३.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
अमृता कायम तिच्या व्यवहारिक आणि खासगी आयुष्यातील नवनवीन गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसेच ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. त्यामुळे ती कायम चर्चेत असते. पण आता होणारी तिची चर्चा मात्र चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच देत आहे.
अमृताने कालच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे तिची ही पोस्ट. तिने पोस्ट मध्ये लिहिले की, “मी तुम्हाला पुन्हा भेटेन…जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर येतील.” तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “गुडबाय… मी ब्रेक घेत आहे.”
यावरून असं लक्षात येत आहे की, अमृताने आता सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. तर या पोस्टवर चाहते निरनिराळ्या प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहे.तिने अचानक घेतलेल्या निर्णयाने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही चाहत्यांना मात्र तिची काळजी वाटत आहे.