झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून सुमी म्हणजे अमृता धोंगडे घराघरात पोहोचली. तिने तिच्या बिनधास्त शैलीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतले आहे.
अमृता नुकतीच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. यंदाच्या जबरदस्त स्पर्धकांमुळे हा शो बराच चर्चेत राहिला. या शोमुळे स्पर्धकांच्या लोकप्रियतेमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. इतकी की पर्व संपले परंतू स्पर्धकांची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे.
यांपैकी एक म्हणजे कोल्हापूरची लवंगी मिर्ची अमृता धोंगडे. बिग बॉसच्या घरातील तिचा बिनधास्त स्वभाव, दमदार आवाज आणि तिच्या खेळीने प्रेक्षकांना भारावून टाकले होते. घराबाहेर आल्यानंतर देखील तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तिच्या चाह्त्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ती कायमच जवळची वाटते.
आता देखील अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावरून पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे अमृताच्या हातावर खूपच सुंदर मेहंदी काढण्यात आली आहे. तसेच अगदी नवरीप्रमाणे तिच्या पायावरही तिने मेहंदी काढून घेतली आहे.
यावरून समजून येते की, अमृताला मेहंदी खूप आवडते. पण तिचा तो व्हिडीओ पाहून सोशल मिडियावर वेगळ्याच चर्चांना उधान आले आहे. ती लग्न करणारा आहे का असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. अनेकजणांनी अशाच प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
तर वारंवार तिच्या लग्नाच्या होणाऱ्या चर्चा पाहून प्रेक्षकांनाही अमृताच्या लग्नाची उत्सुकता आहे.