प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाहसोहळा:
01
of 09
दगडू म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परबला आज अग्नीच्या साक्षीने खऱ्या अर्थाने पराजू भेटली.
01
of 09
02
of 09
प्रथमेशचं ‘क्षितिजा घोसाळकर’सोबत आज (२४ फेब्रुवारी २०२४ रोजी) मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.
02
of 09
03
of 09
प्रथमेश आणि क्षितिजा यांचा हा विवाहसोहळा क्षितिजाच्या माहेरी म्हणजेच कोकणातील श्रीवर्धन येथे संपन्न झाला.
03
of 09
04
of 09
त्यांच्या या लग्नसोहळ्याला त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती.
04
of 09
05
of 09
लग्नाच्या निरनिराळ्या कार्यक्रमात त्यांनी वेगवेगळा पेहराव केला, पण लग्नात मात्र दोघेही मराठमोळ्या अंदाजात दिसले.
05
of 09
06
of 09
लग्नासाठी क्षितिजाने खास पिवळ्या रंगाची अन् त्यावर उठाव गुलाबी रंगाची काठ असलेली नऊवारी साडी नेसली होती.
06
of 09
07
of 09
तसेच तिने नाकात घातलेली नथ, कानातील झुमके आणि तिने मोकळे सोडलेल्या केसांमुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले.
07
of 09
08
of 09
तर प्रथमेशने क्षितिजाला साजेसा असा पांढऱ्या रंगाचा कुर्ता अन् त्याखाली गुलाबी रंगाचे धोतर नेसले होते.
08
of 09
09
of 09
माथी मुंडावळ्या, हाती एकमेकांचा हात आणि चेहऱ्यावर सुंदर हसू चिरंतर असताना डोक्यावर अक्षता पडल्या.
09
of 09