मागील काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत लगीनसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. अशातच आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब.
01
of 10
प्रथमेश आणि क्षितिजा लवकरच म्हणजे येत्या २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
01
of 10
02
of 10
या दोघांची ओळख Instagram वर झाली होती, आणि टाईमपास ३ च्या शुटींगच्या दरम्यान त्या दोघांची ठाण्यामध्ये पहिली भेट झाली होती.
02
of 10
03
of 10
दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ३ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर ते दोघ लग्नगाठ बांधणार आहेत.
03
of 10
04
of 10
२०२३ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी त्या दोघांनी आपल्या नात्याची कबुली सोशल मिडियावर दिली.
04
of 10
05
of 10
१४ फेब्रुवारी ही तारीख या दोघांसाठी खूपच खास आहे. याच दिवशी प्रथमेशने प्रेमाची कबुली दिली होती. आणि त्यांच्या रिलेशनला ३ वर्ष पूर्ण होताच याच दिवशी त्यांनी साखरपुडा देखील केला.
05
of 10
06
of 10
या दोघांच्या साखरपुड्याची अंगठी देखील खूपच खास आहे. अंगठीमध्ये दोघांच्याही नावाचे पहिले अक्षर आहे.
06
of 10
07
of 10
सुरवातीला केळवण मग साखरपुडा तर आता लग्नाची लगबग सुरु आहे.
07
of 10
08
of 10
नुकतेच साखरपुड्यानंतर प्रथमेश त्याच्या सासरी म्हणजेच क्षितिजाच्या गावी कोकणात गेला होता.
08
of 10
09
of 10
तर आता नुकतेच या दोघांनी प्री-वेडींग शूट केले आहे. याचे काही फोटो त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.
09
of 10
10
of 10
यामध्ये प्रथमेशने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये हे दोघेही खूपच छान दिसत आहेत.
10
of 10
तर आता सगळ्यांचे या दोघांच्या लग्नाकडे लक्ष लागले आहे.