नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही अत्यंत लोकप्रिय वेब सिरीज आहे, लोकांनी या वेब सिरीज ला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मूळ स्पॅनिश भाषेतली या सिरीजचे आतापर्यंत ५ भाग प्रदर्शित झाले, सिरीजमधील शेवटचा भाग पाहून प्रेक्षक भारावून गेले.
या सिरीजची कथा देखील उत्तम आहे, स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र घेऊन बँकेत चोरीचा प्लॅन आखतो. प्रत्येक शहरावरून प्रत्येक पात्राला नाव देण्यात आलं, या सिरीज मधील सगळेच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
View this post on Instagram
याच पात्रांपैकी अत्यंत लोकप्रिय असं पात्र म्हणजे ‘बर्लिन’, या पात्राची कथा पहिल्याच चोरी नंतर संपली. पण या पात्राला मिळणारी लोकप्रियता बघता हे पात्र पुढील भागातही दिसून आले, ‘बर्लिन’च बोलणं, त्याचं चालणं, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि सिरीज मधील त्याच महत्व हे आजही लोकांच्या लक्षात आहे. पाचवा सिझन संपल्यानंतरही बर्लिन पुन्हा येणार याची चर्चा सुरु होती, फॅन्सना मात्र बर्लिनचा शेवट मान्य नव्हता. आता ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘बर्लिन’ वर एक स्पिन ऑफ सिरीज घेऊन येत असल्याचं जाहीर केलं आहे. नेटफ्लिक्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामुळे चाहते आता उत्सुक झाले आहेत. परंतु सिरीजच्या रिलीज ची तारीख अजून जाहीर केली गेली नाही.