२००५ साली प्रदर्शित झालेल्या गजनी या तमिळ चित्रपटात सूर्या, नयनतारा आणि असिन हे मुख्य भूमिकेत होते, नंतर त्याचं सिनेमाचा २००८ मध्ये मुर्गदास यांनी हिंदी मध्ये रिमेक केला. या सिनेमात आमीर खान,असिन आणि जिया खान हे मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा दोन्ही भाषेत सुपरहिट ठरला, हिंदी मध्ये तर तब्बल १०० करोड या सिनेमाने कमवले.
मुर्गदास आता ३ वर्षाच्या ब्रेक नंतर पुन्हा दिग्दर्शनात परतणार आहेत. सध्या सर्वत्र गजनी सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुर्गदास यांनी २००५ मधील सुपरहिट तामिळ सिनेमा गजनीच्या सिक्वेलची तयारी सुरु असल्याचा इशारा दिला आहे. त्यांचा गजनी २ हा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित करणार आहेत, हा सिनेमा एकाचवेळी हिंदी, तेलगु, कन्नड, मल्याळम या भाषा मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात करोडपती संजय आणि स्ट्रगलिंग मॉडेल कल्पनाची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. पण या लव्ह स्टोरीचा शेवट मात्र खूप दुःखद दाखवला होता. त्यामुळे सिनेमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा लव्ह स्टोरीच पाहायला मिळणार का? की यावेळी काही वेगळ असेल यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
या सिनेमाच्या पहिल्या भागात मुख्य भूमिकेत सूर्या होता, सूर्या हा मुर्गदास यांचा फेव्हरेट अभिनेता आहे. मात्र आता दुसऱ्या भागात कोणता अभिनेता असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हिंदी मधील रिमेकमध्ये आमीर खान हा मुख्य भूमिकेत होता, त्याने सिनेमात उत्तम काम केले होते. असिन ही दोन्ही सिनेमात होती. तामिळ मध्ये जी भूमिका नयनताराने केली होती, तिच भूमिका हिंदी मध्ये जिया ने केली होती.
सिनेमाच्या सिक्वेल मध्ये मुख्य भूमिकेत सूर्या दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या सूर्या त्याच्या करिअरच्या अतिशय चांगल्या टप्प्यावर आहे. त्याच्या जय भीम या सिनेमातील भूमिकेच सगळ्यांनी कौतुक केलं होत. आता ३ वर्षाच्या ब्रेक नंतर मुर्गदास परत येत आहेत. अस म्हंटल जात आहे की गजनी २ च्या सिक्वेल मध्ये हिंदीतील संजय सिंघानिया आणि तामिळ मधील संजय रामास्वामी म्हणून दाखवलेल्या बिझनेसमनचीच स्टोरी पुढे नेली जाईल. हा सिनेमा कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे.