जितेंद्र जोशी हे मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. जितेंद्र हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, त्याच बरोबर तो एक उत्तम लेखक आणि कवी देखील आहे. जितेंद्र हा नेहमीच सोशल मिडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या कविता देखील सोशल मिडियावर पोस्ट करत असतो, त्याचे चाहते नेहमीच त्याच्या कवितेला भरभरून प्रेम देत असतात.
जितेंद्रचं त्याच्या आईशी खूप घनिष्ठ नातं आहे. तो त्याच्या नावात आईचं नाव लावतो ‘जितेंद्र शकुंतला जोशी‘ यावरून त्याचं आईशी असलेलं बाँडिंग दिसून येतं. काल जितेंद्रच्या आईचा म्हणजेच शकुंतला जोशी यांचा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्रनं त्याच्या भावना कवितेमधून व्यक्त केल्या आहेत. ही कविता जितेंद्रनं त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही कविता पोस्ट करताना त्यानं आईला शुभेच्छा तर दिल्या आहेच. शिवाय ही कविता जितेंद्रनं सर्व मातांना समर्पित केली आहे.
View this post on Instagram
जितेंद्रनं सोशल मीडियावर ही कविता शेअर करत असताना आईचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तरुणपणीची आई, आईबरोबरचा त्याचा फोटो, तसंच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आणि जितेंद्रची लेक आणि त्याची आई यांचे काही फोटो त्यानं शेअर केले आहेत. या फोटोंमधून आईशी त्या सर्वांचं असलेलं अनोखं बाँडिंग दिसत आहे. जितेंद्रनं त्याच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करताना जी कविता लिहिली आहे ती अतिशय भावुक करणारी आहे. जितेंद्रनं ही कविता हिंदीमधून लिहिली आहे. कवितेचं शेवटचं कडव अतिशय भावुक करणारं असं आहे. जितेंद्रनं लिहिलं आहे की,’मां आखरी चाह मेरी है, इसको भी तुम पूरी करना, जब तक मेरी आंख है ज़िंदा खुद को उससे दूर ना करना…’ पोस्टच्या शेवटी जितेंद्रनं आईला टॅग करत तिचा मुलगा असल्याचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.