बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री करीना आणि करिश्मा कपूर यांचा त्यांच्या आई-वडिलांसोबतचा एक फोटो आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या फोटोमागील कारणही तेवढेच खास आहे.
करीना आणि करिश्मा कपूर यांचे पालक म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर व बबिता. रणधीर कपूर आणि बबिता यांच्यातला दुरावा आता पूर्णपणे संपला आहे. रणधीर कपूर आणि बबिता या दोघांची पहिली भेट ही १९६९ मध्ये झाली होती. त्यांच्यात हळू हळू प्रेमाची कळी फुलू लागली. त्यानंतर घराच्यांच्या परवानगीने ६ नोव्हेंबर १९७१ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले.
प्रेमविवाह करून त्यांनी सुरुवातीचे काही वर्षे आनंदात घालवले, परंतू काही वर्षांनंतर त्यांच्यातील मतभेद खूप वाढले. रणधीर यांना करियरमध्ये मिळणाऱ्या अपयशामुळे त्यांना दारूची सवय लागली त्यामुळे बबिता आणि त्यांच्यातील वाद वाढले. तसेच करीना आणि करिश्माने सिनेमांमध्ये काम करू नये अशी रणधीर यांची इच्छा होती.
यामुळे १९८८ साली बबिता दोन्ही मुलींना घेऊन वेगळ्या राहायला लागल्या. तेव्हापासून ते आतापर्यंत ते दोघेही पती-पत्नी वेगळे राहत होते. परंतू त्यांनी आजवर घटस्फोट घेतला नव्हता. तर आज तब्बल ३५ वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र राहणार आहे.
रणधीर कपूर आणि बबिता यांच्या या निर्णयामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक फारच खूश झाले. तसेच त्यांच्या मुलीही प्रचंड आनंदात आहेत. त्याचे कारण म्हणजे आता ते दोघेही उतारवयात आले आहे. प्रेमविवाह असूनही ते दोघे इतक्या वर्षांच्या अंतरानंतरही पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.