बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ. कतरिनाने आजपर्यंत तिच्या कामाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. मागीलवर्षी डिसेंबर मध्ये कतरिनाने विकी कौशल सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचं पहिलं वर्ष म्हणजे सर्व काही स्पेशल, त्यामुळे तिच्या नवीन आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
कतरिनाचा “फोन भूत” हा नवीन सिनेमा येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. फोन भूत हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये कतरिनासह सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे अभिनेते दिसणार आहेत.
कतरिना जरी सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असली तरी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यालाही पुरेसा वेळ दिला आहे. फोन भूत या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसली. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत.
View this post on Instagram
द कपिल शर्मा शो चा होस्ट कपिलने जेव्हा कतरिनाला विचारले की तुला तुझ्या सासरी काय हाक मारतात. तसेच तुझ्या सासूबाई तुला कोणत्या नावाने हाक मारतात?
त्यावर तिने उत्तर दिले की, मला लग्नानंतर सासरी गेल्यावर एक नवीन नाव मिळालं आहे. तर कतरिनाचं नवीन नाव म्हणजे कॅट वगेरे नाही तर ‘किट्टो’ या नावाने तिला सासरी हाक मारतात.
विकीचं कुटुंब पंजाबी आहे त्यामुळे किट्टो या नावाला एक खास पंजाबी फ्लेवर आला आहे. त्यामुळे सासरी सगळेच तिला या नावाने हाक मारतात. आणि मजेदार गोष्ट म्हणजे पती विकी मात्र अनेकदा कतरिनाला ‘पॅनिक बटन’ नावाने बोलवतो. याचे कारण असे की कतरिना छोट्या छोट्या गोष्टींमुळे पॅनिक होते.