अप्लावधीत बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी सोशल मिडियावर कायमच ॲक्टिव असते. लवकरच जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.
प्रोफेशनल आयुष्यासह ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत असते. आतासुद्धा तिच्या खासगी आयुष्यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. जान्हवीच्या लाइफपार्टनर बद्दल नेटकरी देखील अनेक तर्क-वितर्क लावत असतात. पण आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या कथित एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियासह दिसली.
View this post on Instagram
शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. जान्हवी एका रेस्टॉरंट मधून बाहेर पडत असताना ती फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहे. जान्हवी नंतर कारमध्ये जाऊन बसते. जी कार तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर ड्राइव्ह करत असतो.
काही दिवसांपूर्वी निर्माता अमृत पाल बिंद्राच्या दिवाळी पार्टीमध्येही ती शिखरसह दिसली होती. जान्हवी कपूर एक्स बॉयफ्रेंडसोबत पाहून, पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं असून जान्हवी कपूर पुन्हा एकदा शिखर पहारियासह रिलेशनशिपमध्ये आहे असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत.