देशभरात असा एकही प्रेक्षक नसेल ज्याला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) माहित नसेल. पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत राजपूत घराघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या स्वभावाने त्याने कायम प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तसेच तो असा एकमेब अभिनेता होता ज्याने सोशल मीडियावर फक्त कलाकार आणि स्वतःच्या नातेवाईकांनाच नाही तर त्याच्या चाहत्यांना देखील तो फॉलो करायचा.
अशा या गोड अभिनेत्याच्या आयुष्यात काळरात्र उजाडली अन् १४ जून २०२० रोजी सुशांतने आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूला ३ वर्षांहून अधिककाळ उलटून गेला तरीही त्याची हत्या झाली होती? की, त्याचे खरंच आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण आजही सुशांत त्याच्या प्रत्येक चाहत्यांच्या मनात घर करून आहे. तसेच आता बिग बॉस हिंदीमध्ये गेलेल्या अंकिता लोखंडेमुळे पुन्हा एकदा सुशांतच्या चर्चा सुरु झाल्या. पण त्याहीपेक्षा आता सुशांतच्या आयुष्यावर नवा सिनेमा येणार आहे का? तसेच त्याच्या बयोपिकवरील चर्चांना सध्या उधाण आले आहे.
परंतू या सर्व चर्चांवर आता मात्र पूर्ण विराम लागला आहे, त्याचे कारणही तसेच आहे. यापूर्वी अनेकांमध्ये सुशांतच्या जीवनावरील सिनेमाची चर्चा जेव्हा रंगली, तेव्हा हा सिनेमा नक्की कोण बनवणार? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे निर्माते संदीप सिंह यांच्याकडून मिळतील असे अनेकांना वाटत होते. याचे निमित्तमात्र सुशांत आणि संदीप हे दोघे खूप खास मित्र. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांना आशा होती की सुशांतचा बयोपिक नक्कीच बनवला जाईल. परंतू आता मात्र सर्वांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. कारण, संदीप यांनी एका सिनेमाच्या मुलाखती दरम्यान यावर भाष्य केले.
यावेळी संदीप सिंह यांना विचारण्यात आले की, “सुशांत सिंह राजपूत यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार का?” तेव्हा ते म्हणाले की, “अजिबात नाही. मला वाटतं सुशांत सिंह राजपूत हा विषय लोकांनी शांततेत घ्यायला हवा. मी त्याच्या आयुष्यावर कधीही सिनेमा बनवणार नाही. सुशांतच्या आयुष्यावर मी सिनेमा बनवावा यासाठी मला चांगले पैसेदेखील देण्यात येत आहेत. सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा आला तर त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाच या गोष्टीचा त्रास होणार आहे.”
तसेच संदीप सिंह पुढे म्हणाले की, “२०२४ हे वर्ष माझं कमबॅक असणार आहे.” यातून त्यांना नक्की काय सांगायचे होते किंवा कोणतं नवीन धमाकेदार प्रोजेक्ट आपल्या सर्वांसमोर येणार? याचा अंदाज बांधणे सध्यातरी अवघड आहे. परंतू त्यांनी सुशांतच्या आयुष्यावरील सिनेमाबद्दल दिलेलं उत्तर ऐकून मात्र अनेकांचे डोळे पाणावले आणि आता पुन्हा एकदा सारेजण त्याच्या आठवणीत गुंग झाले.