हिंदी मालिका विश्वातील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अनेक वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे ‘दिलीप जोशी व दिशा वकाणी’ यांनी दयाबेन व जेठालाल ही भूमिका साकारली.
दिलीप जोशी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरेसलामला येथे स्वामीनरायण मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अबू धाबीला असणार आहे. तर स्वामीनारायणच्या बीएपीएसच्या समुदाय लवकरच तिथे एक खूप भव्य असं स्वामीनारायण मंदिर बनवणार आहे. दिलीप यांनी लिहिलं की ‘जय स्वामीनारायण ऐसे जरूरी और खुशी के अवसर के लिए हार्दिक निमंत्रण!’
View this post on Instagram
तर हा व्हिडिओ पाहून दिलीप जोशी मालिकेतून ब्रेक घेणार अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. या व्हिडिओ विषयी अद्याप कोणतेही फोटो किंवा कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही पोस्ट त्यांच्या धार्मिक यात्रेविषयी अनेक गोष्टी सांगते.
सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत गणेश चतुर्थीचे धुमधडाक्यात स्वागत सुरू असताना दिलीप यांनी बाप्पाची पहिली आरती करून इंदूरला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी खुलासा केला की ते गणेशउत्सवाचा भाग होणार नाहीत. जेठालाल मालिकेतून बाहेर जातानाचा ट्रॅक दाखवण्यात आला आहे. यावरून असे दिसून येते की त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. परंतु अजूनही यावर शिक्कामोर्तब झाला नाही.
असे असले तरी चाहते जेठालालची मालिकेत परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी वाचा: या लोकप्रिय मालिका येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला…