‘Red FM’ हे फक्त महारष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठे रेडीओ स्टेशन आहे. मागील काही वर्षांपासून ‘रेड एफएम’हे मराठी फिल्म फेस्टिवलचे आयोजन करत आहे. या फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने ‘रेड एफएम’हे जुन्या चित्रपटांना, कलाकारांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. यावेळी अनेक जुन्या चित्रपटांची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली जाते, तसेच अनेक नवीन चित्रपटांची पहिली झलक दाखवली जाते. अनेक चित्रपट प्रदर्शित केले जातात. आणि अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे लघुपट प्रदर्शित केले जातात. चित्रपट प्रदर्शित करण्याव्यतिरिक्त प्रेक्षकांना, नवीन कलाकारांना आणि नवीन दिग्दर्शकांना, निर्मात्यांना त्यांच्या कामामध्ये चालना मिळण्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी चित्रपटसृष्टीतील मोठ मोठ्या आणि त्यांच्या कामात पारंगत असणाऱ्या उद्योजक, कलाकार मंडळी यांच्याशी सवांद साधायची संधी मिळते.
यंदा ‘RED FM सुपर हिट्स मराठी फिल्म फेस्टिवल’चे ५ वे वर्ष आहे. हा फेस्टिवल पुण्यामध्ये ८ ते १० मार्च मध्ये होणार आहे. या फेस्टिवलसाठी कोणत्याही तिकीटाची किंवा बुकिंगची गरज नाही. सगळ्यांना या फेस्टिवलमध्ये विनामुल्य प्रवेश मिळणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मराठी कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि ‘स्थळ’या चित्रपटाच स्क्रीनिंग ठेवण्यात आली आहे.
फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी ‘बाई पण भारी देवा’या सिनेमातील कलाकार रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुरुची अडारकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: हास्यजत्रेची टीम पोहोचली ऑस्ट्रेलियाला, प्राजक्ताच्या पोस्टने वेधले लक्ष…
फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी ‘एकदा काय झाले’ या सिनेमातील कलाकार उर्मिला कानेटकर, पुष्कर श्रोत्री, सुमित राघवन आणि गायक सलील कुलकर्णी यांच्यासोबत बोलता येणार आहे. तसेच धडाकेबाज या सिनेमाच्या निमित्ताने महेश कोठारे यांच्याशी गप्पा मारायची संधी मिळणार आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाच स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात येणार आहे आणि या सिनेमातील सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव, हेमंत ढोमे, शिवानी सुर्वे, सुहास जोशी, क्षिती जोग हे कलाकार प्रेक्षकांना भेटण्यासाठी येणार आहेत.
याव्यतिरिक्त अनेक फिचर फिल्म आणि काही निवडक लघुपट देखील पाहायला मिळणार आहेत.