आजपर्यंत अनेक कार्यक्रम येऊन गेले आहेत. पण त्यापैकी फार कमी कार्यक्रम असतात, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. त्यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपलसं वाटू लागतं. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो, यामधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतं. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी घरी आल्यावर अगदी उत्सुकतेने हा कार्यक्रम पाहिला जातो. हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर परदेशातही या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या या कार्याक्रमाची संपूर्ण टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. मागच्या वर्षी संपूर्ण टीम ही अमेरिकेला गेली होती, तर काही दिवसांपूर्वीच सिंगापूरच्या दौऱ्यावर गेली होती. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न, सिडनी इथे संपूर्ण टीम लाईव्ह कार्यक्रम करणार आहे. या दौऱ्यावर महाराष्ट्राची हास्यजत्रामधील वनिता खरात, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत आणि कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी देखील गेली आहे. याचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये वनिता खरात, चेतना भट, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत आणि त्यांच्या सोबतच या कार्यक्रमाचे निर्माते सचिन मोटे हे सुद्धा दिसून येत आहेत. या सगळ्यांनी मिळून ‘कुडिये नी’या ट्रेंडीग गाण्यावर रील शूट केली आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओखाली प्राजक्ताने कॅप्शन देत लिहिलं आहे की, “When In Australia and bunch of mad people comes together. At #philpisland सचिन मोटे सर सुद्धा सामील झाले, याचा विशेष वाला आनंद (Behind the scenes साठी stories पहा) Loved the island too.”
त्यांच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. काहींनी लिहिले की गौरव मोरेला मिस करतोय. तर एकाने लिहिले आहे, “काल मेलबर्न मधील शोला मज्जा आली.” तर काहींनी लिहिले आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम आमचं मनोरंजन करण्यात कधीच कमी पडत नाही. तसेच या व्हिडीओवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.