बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. लंच, डीनर तसेच आय.पी.एल बघण्यासाठीसुद्धा दोघे एकत्र गेले होते. मात्र त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनबद्दल अजूनही काही सांगितले नाही.
लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार असून येत्या १३ मे ला त्यांचा साखरपुडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांचा साखरपुडा दिल्लीत होणार असून फक्त १५० पाहुणे त्यांच्या साखरपुड्याला उपस्थितीत असणार आहेत. परिणीती चोप्रा व राघव यांचा साखरपुडा कुटुंबीय व जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
परीणीतीच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साखरपुड्याची अगदी जोरदार तयारी सुरु आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने परिणीतीच मुंबईतील घर अगदी रोषणाईने सजले आहे. तिच्या घराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून चाहते त्या व्हिडीओला कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
परिणीती गेल्या काहीदिवसांपुर्वी मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर दिसण्यात आली आहे. यावरून असे बोलले जात आहे क, परिणीती मनिष मल्होत्रा यांनी डीझाइन केलेलं आउटफिट परिधान करणार असून तीच लूक आलिया व कतरिना पेक्षा हटके असणार आहे.