आज अयोध्येतील राम मंदिरात अभिजीत मुहूर्तावर प्रभू श्री राम यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. ५०० वर्षे भाविक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, असा क्षण आज खऱ्या अर्थाने आला अन् करोडो लोकांच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण झाले.
या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त देशभरातील अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. तसेच सोशल मीडियावर देखील असंख्य पोस्टमधून प्रभू श्री रामाचा गजर सुरू आहे. आज पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात देशभरात दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळे आजचा दिवस खूपच उत्साहात साजरा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
तसेच आपले लाडके कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील एक खास पोस्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. ही पोस्ट करत असताना तिने सूर्योदयाचा एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “२२ जानेवारी २०२४. सुवर्णदिन” तसेच पुढे लिहिले की, “शतकांच्या यज्ञातून उठली, एक केशरी ज्वाळा… दहा दिशांच्या ह्रदयामधूनी, अरुणोदय झाला…सगळं सुंदर, मंगलमय, पावित्र्यपुर्ण असू दे; प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे. ही प्रत्येक ‘भारतीयाची’ भावना असू दे.”
प्राजक्ता माळीने तिच्या भक्तीतून तमाम भारतीय रामभक्तांसाठी हे आवाहन केले. तिच्या या पोस्टवर अनेकांनी “जय श्री राम” सारख्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी आपल्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या. एकूणच काय तर सध्या संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला आहे.
तसेच अभिनेता अमोल नाईक याने देखील स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “जय सिया राम. खूप वर्षापासून आम्ही सगळे या दिवसाची वाट बघत होतो, तुम्ही घरी परत येणार हे ऐकून खूप आनंद झाला, सोपं तर कोणासाठीच नव्हतं, आम्हाला माहीत आहे तुम्ही ही या क्षणाची वाट बघत होतात, डोळे भरून तुम्हाला बघत बसावं अस वाटत आहे, आमचे डोळ्यातील अश्रू हे आनंदाश्रू आहेत, ते आता फक्त तुमचे दर्शन झाल्यावरच थांबतील, देवा तूमचे अयोध्या नगरीत स्वागत आहे, आमचं आयुष्य सार्थकी लागले आणि या जन्माच सोन झालं असच आम्हाला वाटतं. जय श्री राम.”
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.