नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ पार पडला. मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही वाहिनी. तसेच या मराठी मालिकांमधील टीआरपीच्या शर्यतीतील कायम अग्रणी असलेली मालिका देखील याच वाहिनीवरील. त्यामुळे यंदाच्या परिवार पुरस्कार सोहळ्यात कोणकोणते कलाकार आणि कोणती मालिका बाजी मारणार याकडे तमाम प्रेक्षकवर्गाचे लक्ष वेधले होते.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ या सोहळ्याची सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता अभिजित खांडेकर, अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हाती होती. तसेच विनोदाचे महारथी पंढरीनाथ कांबळे आणि विशाखा सुभेदार यांनी कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले. तर चला पाहूया या पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली…
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य (स्त्री): गुंजा – कुन्या राजाची गं तू राणी
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य (पुरुष): सागर – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा (स्त्री): सावनी – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा (पुरुष): मल्हार – तुझेच मी गीत गात आहे
सर्वोत्कृष्ट निवेदक: वैदेही परशुरामी, सारा
सर्वोत्कृष्ट आई: मुक्ता – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट वडील: अण्णा – मन धागा धागा
सर्वोत्कृष्ट भावंड: कला, नैना, काजल – लक्ष्मीच्या पावलांनी
सर्वोत्कृष्ट मुलगी: कला – लक्ष्मीच्या पावलांनी
महाराष्ट्राचा धमाका: सिद्धार्थ जाधव
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व: सिंधू – लग्नाची बेडी
महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी: पिंकी आणि युवराज – पिंकीचा विजय असो
सर्वोत्कृष्ट खलनायिका: रागिणी ( शुभविवाह ), सावनी ( प्रेमाची गोष्ट )
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी: नित्या व अधिराज ( सुख म्हणजे नक्की काय असतं )
सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी: सायली-अर्जुन – ठरलं तर मग
सर्वोत्कृष्ट सासू: रमा आई – अबोली
सर्वोत्कृष्ट सून: रमा – मुरांबा
सर्वोत्कृष्ट पती: सार्थक – मन धागा धागा जोडते नवा
सर्वोत्कृष्ट पत्नी: भूमी – शुभविवाह
सर्वोत्कृष्ट परिवार: सुभेदार कुटुंब- ठरलं तर मग
महाराष्ट्राची महामालिका: ठरलं तर मग
विशेष सन्मान: आई कुठे काय करते