‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत पोहोचला आहे. या शोची आणि शोमधील कलाकारांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. तसेच कलाकार साकारत असलेल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोमुळे ‘रसिका वेंगुर्लेकर’(Rasika Vengurlekar) ही देखील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
हास्यजत्रेतील रसिकाच्या निरनिराळ्या भूमिका आणि खासकरून तिच्या मालवणी भाषेतील भूमिका व विनोद प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील तिची ‘मँगो बर्फी’(प्रग्या) ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे आजही तिचा अभिनय आणि तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत कायमसाठी ठसल्या आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, रसिकाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी दिग्दर्शक अनिरुध्द शिंदे सोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी ते दोघे १० वर्षे एकमेकांसोबत होते. आता त्यांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. तर लग्नाच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त अनिरुध्दने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लाडक्या बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पोस्ट शेअर करत अनिरुध्द म्हणाला की, “माऊ, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्याबरोबर असतेस. अशीच माझ्याबरोबर आयुष्यभर राहा. माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस. माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही. त्याच्याबरोबर असणारी माणसं, पाठीशी असलेली त्याची साथ यामुळे त्याला बळ मिळतं आणि मी यशस्वी होण्यामध्ये तुझा मोलाचा वाटा आहे.”
तसेच पुढे तो म्हणाला, “तुलाही आयुष्यात मोठं होताना बघून खूप आनंद होत आहे. खूप कौतुक वाटतं तुझं, तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी तुझ्यासोबत कायम आहे. दोघांनी मिळून अशीच मेहनत करूया. कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे आणि या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माऊ.” रसिकानेही “आय लव्ह यू माऊ” असे लिहीत या पोस्टवर कमेंट केली.
View this post on Instagram
अनिरुद्ध शिंदेने ‘का रे दुरावा’, ‘फ्रेशर्स’ सारख्या प्रसिद्ध मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. अनिरुद्धच्या फ्रेशर्स या मालिकेत रसिकाने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच तिने अनिरुद्धच्याच ‘फ्रेशर्स’ मालिकेत रेणुका भिल्लारेची भूमिका साकारली होती. दोघेही खूप आधीपासून रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे दोघांचाही स्ट्रगलचा काळ एकत्रितपणे सुरू झाला. या काळात दोघांनी एकमेकांना आधारही दिला आणि साथ ही दिली.
अनिरुद्धच्या या पोस्टवर लाइक्सचा वर्षाव होत आहे, तर सिनेसृष्टीतील कलाकार आणि त्या दोघांचे चाहते या पोस्टवर कमेंट्स करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.