अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. सारा अली खान आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सारा आणि विकी सध्या अनेक ठिकाणांना भेट देत आहे. नुकतंच तिनं मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. साराने मंदिरातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. मंदिरातील व्हिडीओ समोर आल्यानंतर साराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. धर्मावरून तिला अनेक टोले लगावण्यात आले. या आधी देखील साराला अशा प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर इंदौरला पोहोचलेल्या सारानं ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलंय.
सारा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या बोल्ड लूक आणि हटके अदांमुळे नेमीच चर्चेत असते. सारा नेहमीच अनेक देवस्थानांना भेट देत असते. काही दिवसापूर्वी ती ‘केदारनाथ’ला देखील जाऊन आली. त्यांनतर तिने ‘अजमेर शरीफ’ येथील दर्ग्याला देखील भेट दिली. सारा मागील २ दिवसांपूर्वी महाकालेश्वराच्या दर्शनासाठी गेली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
या ट्रोलर्सला आता साराने सडेतोड उत्तर दिले आहे, या विषयी बोलताना सारा म्हणाली, “मी माझ्या कामाबाबतीत फार सीरियस आहे. मी लोकांसाठी काम करत नाही मी माझ्यासाठी काम करते. तुम्हाला मी आवडले नाही तर त्याचं मला फार वाईट वाटेल. प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांसाठी काम करतो. पण माझ्या वैयक्तिक श्रद्धा या माझ्या आहेत. ज्या श्रद्धेनं, भक्तीनं मी बंगला साहिब किंवा महाकालेश्वरला जाते ज्यात श्रद्धेनं मी अजमेर शरीफला देखील जाते आणि यापुढेही जात राहिन. लोकांना काय करायचं आहे ते करून देत त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सकारात्मक वाटत असेल तर मी तिथे नक्की जायला हवं. माझा उर्जेवर विश्वास आहे.”