भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या निरनिराळ्या कौशल्यांनी आणि सादरीकरणाने आपल्या सर्वांचे मन जिंकत असतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे अनेक कलाकार आज सिनेसृष्टीत आहेत, पण खऱ्या-खुऱ्या स्वभावाने अनेकांचं मन जिंकणं काही सोप्पं नाही.
असे असले तरी यातही कलाकारांची भलीमोठी यादी आहे. तर आता यात आणखी एका कलाकाराच्या त्या कृत्याने सर्वांचे मन जिंकले आहे. तर तो कलाकार म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol). बॉबी देओलने अभिनयाच्या जोरावर तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सिनेमाचे आणि त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
प्रेक्षकवर्ग जसा कलाकारांमध्ये भेदभाव करीत नाही, अगदी तसंच कलाकार देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये गरीब-श्रीमंत, काळा-गोरा असा कोणताच भेदभाव करत नाहीत. त्यातच बॉबी देओलला देखील त्याच्या अचानक भेटलेल्या चाहत्यांसोबतचा सध्याचा एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे. त्याच्या या व्हिडीओने साऱ्यांचे मन पुन्हा एकदा जिंकून घेतले आहे. बॉबी देओल जसा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. तसाच तो त्याच्या साध्या, सरळ अन् प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो. तर आता या व्हायरल व्हिडीओमधून पुन्हा एकदा बॉबीचा या दयाळू, मायाळूपणा आपल्या सर्वांना पाहायला मिळाला.
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडीओमध्ये बॉबी देओल एकटा नसून त्याच्यासोबत दोन लहान मुले आहेत. यावेळी बॉबीने या मुलांच्या दिशेने एक मदतीचा हात पुढे केला आहे. बॉबी देओलने या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५००-५०० रुपये देऊ केले. आणि हाती किती मोठी किंमत येतेय यापेक्षा या दोघांचाही आनंद पराकोटीचा आहे. त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खूपचं प्रकर्षाने दिसत होता. तसेच पैसे दिल्यावर बॉबी देओल त्यावरच थांबला नाही, तर त्याने संपूर्ण मीडियासमोर त्या मुलांसोबत फोटोदेखील काढले. हे फोटो काढताना मुलं तर खुश होतीच शिवाय त्यांनी फोटोसाठी सुंदर पोज देखील दिली.
तर हा व्हिडीओ पाहून साऱ्यांनाच समाधान वाटले. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून सारेजण व्यक्त होत आहे. एकाने लिहिले की, “यामुळेच बॉबी रिअल लॉर्ड बॉबी आहे.” तर हे पाहून दुसऱ्याने लिहिले की, “देशात आजपण माणुसकी शिल्लक आहे.” तर अनेकांना या पोस्ट खाली “रिअल हिरो” ही कमेंट देखील केली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून बॉबी देओलचे चाहते या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. बॉबी देओलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या सिनेमामुळे बॉबी देओल प्रचंड चर्चेत आला होता. तर आता कांगुवा या आगामी सिनेमात तो लवकरच झळकणार आहे.