मागील काही दिवसांपूर्वी एलॉन मस्कने ट्विटर अकाऊंटवरील अनेकांचे ब्लू टिक काढून घेतले. यात अनेक दिग्गज मंडळींचा समावेश आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान पासून ते अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क याने ट्विटर विकत घेतले, त्यावेळी त्याने ट्विटरमध्ये अनेक बदल केले. तर आता ब्लू टिकसाठी सगळ्यांना पैसे मोजायला लागणार आहेत.
View this post on Instagram
ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर सोशल मिडियावर अनेक मिम्स येत आहेत. यामध्ये शाहीद कपूरचा देखील समावेश आहे. शाहीदचा कबीर सिंग मधील एक डायलॉग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आणि यावर शाहीद कपूरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शाहीदने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटातील एक दृश्य दाखवल आहे. त्यात शाहीद बुलेट वरून रागात जाताना दिसून येत आहे. त्यावर नेटकऱ्याने लिहिले आहे, “ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूर हा एलॉन मस्ककडे जात आहे, माझं ब्लू टिक परत दे”.
यावर कमेंट करत शाहीदने लिहिले आहे की, “ माझ्या ब्लू टिकला कोणी हात लावला… एलॉन… तू तिथेच थांब, मी येतोय”. ब्लू टिक काढलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांसारख्या अनेकांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक पुन्हा दिल्यानंतर अमिताभ यांनी मजेशीर ट्वीट करत एलॉन मस्कचे आभार मानले आहेत.