फॅशन, लाइफस्टाइल आणि जिच्या अभिनयाच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) वैविध्यूर्ण भूमिका तिने कायम साकारल्या आणि प्रेक्षकांना मोहित केलं. अभिनयाच्या पलिकडे जाऊन ही अभिनेत्री एक कलाकार सुद्धा आहे हे तिच्या सोशल मीडियावरून कळून येतं. मग ते नृत्य असो किंवा चित्रकला संस्कृती कायम स्वतःचे छंद जोपासताना दिसते.
काही दिवसांपासून संस्कृतीने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता आणि आता नुकतीच ती सोशल मीडियावर पुन्हा आली आहे. आता तिने हा सोशल मीडिया ब्रेक का घेतला होता? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. संस्कृतीने सोशल मीडियावर कम बॅक केलं ते थेट लेह लडाकच्या स्टोरीमधून आता ती तिकडे शूटसाठी गेली होती की कामासाठी हे अजून स्पष्ट झालं नाही.
हल्ली अनेक कलाकार स्वतःच्या धावपळीच्या जगातून ब्रेक घेण्यासाठी सोशल डिटॉक्सवर जातात. पण संस्कृती ही कायम सोशल मीडियावर ॲक्टिव असलेली अभिनेत्री अशी अचानक का गायब झाली असावी? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. संस्कृती स्वतः हा या बद्दल काही सांगणार का? नवीन प्रोजेक्ट्स बद्दल काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
आगामी काळात संस्कृती बालगुडे बॉलिवूड मध्ये दिसणार आहे. सोबतीने ती अनेक प्रोजेक्ट्समधून सुद्धा दिसणार आहे.