‘पठाण’ नंतर सगळीकडे चर्चा सुरु आहे, ती म्हणजे ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची. सलमान खान चा चित्रपट आहे म्हंटल्यावर चर्चा तर होणारच. सलमानचे फक्त भारतात नाही तर जगभरात चाहते आहेत. त्याच्या चित्रपटाची सगळे उत्सुकतेने वाट पाहत असतात. त्यात शाहरुख खान या चित्रपटात दिसणार आहे हे समजल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
या बहुचर्चित चित्रपटाच एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘येनतम्मा’ हे गाणे रिलीज होताच चर्चेत आहे, त्याच कारण असं की या गाण्यात सलमान खान सोबत साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि दग्गुबती व्यंकटेश साऊथ इंडियन लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. काही वेळातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आतापर्यंत जवळपास 43 दशलक्ष व्ह्यूज झाले आहेत.
नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाल्या पासून राम चरण चांगलाच चर्चेत आहे. आता राम चरण सलमान सोबत त्याच्या गाण्यात डान्स करताना दिसून येतोय. यामुळे चाहते देखील खुश झाले आहेत. याचा अनुभव राम चरणने सांगितला आहे.
‘येनतम्मा’च्या बीटीएस व्हिडिओमध्ये राम चरणने सलमान खानसोबत डान्स करताना आपल्या भावना शेअर केल्या आहेत. राम म्हणतो, “हे गाणे धमाकेदार आहे, हे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. एका लहान मुलाचे स्वप्न पूर्ण झाले. हे गाणे करताना मजा आली. खूप खूप धन्यवाद सलमान भाई. लव्ह यू सो मच”. सध्या या गाण्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
या सिनेमात सलमान आणि पुजा हेगडे सोबत शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, हार्डी संदू आणि सिद्धार्थ निगम हे नवीन कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.