छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात अभिनेते ‘आदेश बांदेकर (Aadesh Bandekar).’ आदेश यांचा कालच ५८ वा वाढदिवस साजरा झाला असून त्यांनी आतापर्यंत तब्बल १९ वर्षांहून अधिक काळात महाराष्ट्रातील हजारो घरात जाऊन या कार्यक्रमाचे ६ हजारांहून अधिक भाग पूर्ण केले आहेत.
याच कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर घरात देखील हक्काची जागा मिळाली. घरोघरी जाऊन त्या घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान करणारे भाऊजी समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनले. सिनेसृष्टीत येण्याआधी आदेश बांदेकर हे नोकरी करायचे. नोकरी करत असतानाच आदेश बांदेकर यांना दूरदर्शनवरील ‘ताक धिना धिन’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची ऑफर आली. आदेश बांदेकर यांनी कसलाही विचार न करता ही ऑफर स्वीकारली आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. याच कार्यक्रमामधून त्यांनी आपला मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू केला.
या दरम्यान त्यांनी काही नाटकांमध्येही काम केले. तर, ‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’ सारख्या मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. २००४ मध्ये ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून ते पुन्हा सूत्रसंचालानाकडे वळले आणि महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी झाले. आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांचा लेक सोहम बांदेकरही अभिनेता आहे. मालिकांमध्ये काम करून तो घराघरात पोहचला. सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याने इंस्टाग्रामवर नुकतीच केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यानी वडिलांनच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, आपली जशी शूजची साइज् सेम आहे, तस मला माझ्या मनाची साइज् तुझ्या मनाएवढी मोठी करण्याची इच्छा आहे! आणि जर त्यात थोडी तरीही वाढ झाली तरी माझा २०२४ सत्कारणी लागला अस वाटेल.” त्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत म्हंटल आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सर’ असे म्हटले आहे. तर काहींनी ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा काका’ अशी कमेंट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
View this post on Instagram
सोहम बांदेकर हा देखील त्याच्या आई-वाडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘नवे लक्ष’ या मालिकेच्या माध्यमातून सोहमने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तसेच त्याने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात देखील काम केलं आहे. बहुचर्चित बाईपण भारी देवा या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मुख्य भूमिकेत होत्या तर सोहमने या चित्रपटात त्यांच्या मुलाची छोटीशी भूमिका साकारली आहे. सध्या सोहम ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.