छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच ‘ठंरल तर मग’. (Tharl Tar Mag) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर अशा दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अनेक मालिकेतील कलाकार आपल्या पुढच्या वाटचालीसाठी नवनवीन सुरुवात करताना दिसून येतात. तसंच या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री देखील लवकरच नाटकमध्ये झळकणार असल्याच बोलल जात आहे. ठंरल तर मग मालिकेतील खलनायिका म्हणजेच प्रियांका तेंडोलकर ही प्रियाच्या भूमिकेमुळे विशेष ओळखली जाते. गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर प्रियांकाला आशा एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मात्र ही भूमिका करत असताना तिला वेगवेगळ्या अनुभवांना समोर जाव लागलं. अभिनेत्रीला स्वतःच्याच नातेवाईकांकडून खूप वाईट अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. मात्र त्यावरून आपलेच नातेवाईक आईला फोन करून टोमणे मारत असल्याचं तिने सांगितलं.
नुकताच तिने तिचे स्वप्न पूर्ण करत रायगड जिल्ह्यातील कोलाड या गावात टुमदार फार्महाऊस देखील बांधलं आहे. प्रियांका तेंडोलकर हिने तिच्या या फार्महाऊसचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोलाड येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या तिच्या या फार्महाऊसला भेट देण्यासाठी तिचे सहकलाकार देखील तेवढेच उत्सुक आहेत.
लवकरच आत्ता प्रियांकाला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ या नव्या नाटकमध्ये पाहता येणार आहे. या नाटकात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘सुभेदार’ फेम अभिनेते अजय पुरकर, अतुल महाजन व आशिष पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. या दरम्यान प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन पोस्ट शेअर करत आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. व त्या पोस्टला “एक नवीन सुरुवात…गणपती बाप्पा मोरया” असं कॅप्शन देखील दिलं आहे.
तसेच तिच्या आगामी येणाऱ्या नाटकासाठी ‘ठंरल तर मग’च्या संपूर्ण टीमने खूप शुभेच्छा दिल्या आहेत तर प्रियांकाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.