सुपरस्टार शाहरुख व गौरी खान हे दोघे बॉलिवूड मधील आदर्श जोडी म्हणून ओळखले जातात. ‘इंटिरियर डिझायनर’ असणाऱ्या गौरीने नेहमीच शाहरुखच्या कठीण प्रसंगात त्याला मदत केली आहे. जेव्हा शाहरुख कडे मन्नत बंगल्याचे ‘इंटिरियर डिझाईन’ करायला पैसे नव्हते तेव्हा स्वतः गौरीने त्यांच्या बंगल्याची ‘इंटिरियर डिझाईन’ केली होती.
बॉलिवूडमध्ये ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून गौरी ला ओळखले जाते. मुंबई मधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शाहरुखने गौरीचे ‘माय लाइफ माय डिझाईन’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. शाहरुखने करिअरची सुरुवात कशी केली हे पुस्तक प्रकाशनाच्यावेळी सांगितले होते. त्यांच्या ‘मन्नत’ बंगल्याविषयी देखील शाहरुखने काही गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांच्याकडे बंगल्याचे डिझाईन करायला पैसे नव्हते तेव्हा स्वतः गौरीने त्यांच्या बंगल्याचे ‘इंटिरियर डिझाईन’ केले. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या बंगल्याविषयी कायम आकर्षण असतो. पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यादरम्यान आपल्या घरामध्ये सर्वात जास्त व्यस्त शेड्यूल गौरीचे आहे असेही शाहरुखने आवर्जून सांगितले.
नंतर त्याने अस म्हंटल कि, ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून गौरीच्या करिअरची सुरुवात ‘मन्नत’ पासून झाली. आम्ही जेव्हा घर खरेदी केले तेव्हा आम्हाला खूप आवडले, परंतु तेव्हा दिल्लीपेक्षा मुंबईमधील घर एवढे महाग असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. ‘मन्नत’च्या आधी एका दिग्दर्शकाने दिलेल्या घरात आम्ही दोघे राहत होतो. ‘मन्नत’ बंगला खरेदी केल्यावर, मुंबईतील घरे किती महाग आहेत याचा अंदाज आम्हाला आला. तेव्हा हा बंगला अगदी मोडकळीस आला होता. एका ‘इंटिरियर डिझायनरला’ आम्ही बोलावले होते, परंतु त्याने जास्त पैसे मागितले. माझा पगारही तेवढा नव्हता. या काळात गौरीने मला खूप मदत केली. तेव्हा मीच गौरीला म्हणालो, ‘तू डिझायनिंग का सुरू करत नाहीस?’ अशा प्रकारे ‘मन्नत’ पासून गौरीचा ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून नवा प्रवास सुरू झाला.”