मराठी अभिनेता देवदत्त नागे हा ‘जय मल्हार’ या मालिकेतून अतिशय लोकप्रिय झाला असून त्याने त्या मालिकेमध्ये खंडेरायाची भूमिका साकारली होती.
ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याने मराठीच नाही तर हिंदी मालिकेमध्ये देखील अतिशय उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्याचे ‘तानाजी’ चित्रपटातील काम पाहून चाहत्यांनी त्याच खूप कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने या चित्रपटामध्ये प्रभास व सैफ अली खानसोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे.
या चित्रपटामध्ये त्याने हनुमानाची भूमिका साकारली असून त्याने एकदम उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे त्याने बऱ्याचदा मुलाखती मधून स्पष्ट केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे चित्रपटातील काम एकदम जबरदस्त असणार अशी प्रेक्षकांना खात्री आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटातील कामाबद्दलचा त्याचा अनुभव त्याने लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
View this post on Instagram
या मुलाखतीमध्ये त्याने अस सांगितले की, ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी मला विचारलं होतं. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. सैफ अली खानबरोबर याआधी मी ‘तान्हाजी’ चित्रपटात काम केलं होतं, त्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना आपलेपणा अधिक वाटत होता. तर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभवही अविस्मरणीय होता. चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कुठेही प्रभास आणि सैफ अली खान यांनी आपण सुपरस्टार आहोत असा आव आणला नाही, त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”
हा चित्रपट 16 जून ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू श्री रामांच्या तर क्रिती सेनोन हि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.