दाक्षिणात्य अभिनेता राम चरण व त्याची पत्नी उपासना हे दोघे नुकतेच आई-वडील झाले आहेत. 20 जून रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून मुलीच्या जन्मानंतर उपासनाला चार दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं उपासना व राम चरण जेव्हा त्यांच्या मुली सोबत रुग्णालया बाहेर आले. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच स्वागत केल व त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
मुलीला घरी आणल्या नंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी बारश्याची तयारी सुरू असतानाचे अपडेट्स उपासना सोशल मीडिया वरुण शेअर करत होती. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या मुलीच नाव काय ठेवणार याची उत्सुकता लागली होती.
View this post on Instagram
राम चरणच्या मुलीचा बारसा अत्यंत पारंपरिक पद्धतीने व थाटामाटात पर पाडण्यात आला बरश्यामध्ये सर्वांनी व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याच्या मुलीच्या नावाने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राम व उपासनाने त्यांच्या लेकीच नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवलं आहे.
या नावाचा अर्थ देखील त्या दोघांनी स्पष्ट केल आहे. या नावाचा अर्थ अगदी खास असून आध्यात्मिक व जागृती निर्माण करणाऱ्या उर्जेच प्रतीक.. असा होतो. राम चरणने या नावाबद्दलची एक पोस्ट देखील सोशल मीडिया वरुण शेयर केली आहे. त्यांच्या मुलीच नाव नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरले आहे व नेटकरी त्याच्या पोस्ट वर कॉमेन्ट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.