झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अश्विनी महांगडे. अश्विनी कायम तिच्या नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या ती स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत दिसत आहे.
तसेच ती तिच्या सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रीय असते. आणि तिच्या चाहत्यांसोबत तिच्या बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. तसेच तिचे नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओ चांगलेच चर्चेत असतात.
तर नुकतेच अश्विनीने तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहे. ते फोटो पाहून प्रत्येकजण तिची स्तुती करत आहेत. एका फोटो मध्ये तिने निळ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर कोल्हापुरी साज, चिंचपेटी, कर्णफुले, हातात बांगड्या, नाकात नथ आणि कपाळी कुंकू असा पारंपारिक आणि सुंदर साज केला आहे. तिच्या फोटोवर तिने “सादगी” असे कॅप्शन लिहिले आहे.
View this post on Instagram
तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने लाल साडीवर मोत्याचे दागिने, चिंचपेटी, मंगळसूत्र, मोत्याचा हार, मोत्याची नथ आणि मोत्याची कर्णफुले असा साज केलेला आहे. त्यामुळे तिचे हे रूप सध्या प्रचंड चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
अश्विनीने हे दोन्ही रूप पाहून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.