Bigg Boss OTT 2: सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी २’ ची. पहिल्या सिझन प्रमाणे हा सिझन देखील चांगलाच गाजत आहे. पहिल्या सिझनवर प्रेक्षकांनी जितके प्रेम केले होते तितकेच प्रेम प्रेक्षक या सिझनवर देखील करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस ओटीटी’ चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी घरात अनेक मातब्बर कलाकार गेले आहेत. सगळेच जण शेरास सव्वाशेर आहेत. तसेच अभिनेत्री पुजा भट्टने देखील घरात प्रवेश घेतला आहे, तिला पाहून प्रेक्षक आणखीनच खुश झाले आहेत.
सध्या बिग बॉस ओटीटीचा हा दुसरा आठवडा सुरु आहे. पहिल्याच आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. दिवसेंदिवस हा शो आणखीनच मनोरंजक होत चालला आहे. अभिनेत्री जिया शंकर हिने देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात जिया झळकली. शोच्या नवीन एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये जियाला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावं लागणार आहे, असं दिसून आल आहे.
या प्रोमोमध्ये एका टास्कदरम्यान जियाला श्वास घ्यायला त्रास होतानाचे दिसून आले. सगळे सदस्य अॅक्टिव्हिटी एरियात दिसत आहेत. सगळेजण एका वर्तुळात उभे आहेत. याच दरम्यान जियाला श्वास घ्यायला त्रास होत असून ती रडताना देखील दिसत आहे , ती बिग बॉसला दरवाजा उघडण्याची विनंती करताना देखील दिसून आले.
जियाला होणारा त्रास पाहून बाकीचे सदस्य देखील चिंतेत असल्याचं दिसून आल आहे. आता जियाला होणारा हा त्रास बघता बिग बॉस काय पाऊल उचलणार हे येत्या एपिसोड्समध्ये कळेल. जियाला पॅनिक अटॅक आल्याचं बोललं जातंय. सध्या या नॉमिनेशन टास्कमध्ये जिया शंकर आणि आलिया सिद्दीकी नॉमिनेट आहेत. आता जिया बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.