सध्या सर्वत्र चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’ काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस ओटीटी’ चा दुसरा सिझन सुरु झाला असून शो च्या नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. या शो मधून आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी आणि पुनीत सुपरस्टार नंतर आकांक्षा पुरी देखील ‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडली आहे. ‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने जैद हदीद ला केलेल्या किसिंग बद्दल मिडिया समोर खुलासा केला आहे.
आकांक्षाने फक्त टास्क पूर्ण करण्यासाठी जैद हदीदला किस केल होत. पण त्यावेळी जैद आकांक्षाला वाईट किसर असल्याचे बोलल्याने यावर आकांक्षाने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. जेव्हा आकांक्षाला जैद हदीदच्या कमेंटबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो माझ्याबद्दल असं बोलेल अशी मला अपेक्षा नव्हती. म्हणजे तो माझ्यासमोर खोटं वागत होता. मी तर त्याला टास्कचा भाग म्हणून किस केले होते. माझ्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट होती टास्क पूर्ण करण्यासाठी मला त्याला ३० सेकंद किस करावे लागणार.”
त्यांच्या किसिंगवर बरेच वाद निर्माण झाले. गेल्या आठवड्यामध्ये अविनाश सचदेवने आकांक्षाला जैद हदीदला किस करण्याचं टास्क दिलं होत. तिने तो टास्क पूर्ण देखील केला होता. पण त्यांच्या या किसिंग सिन नंतर ‘बिग बॉस’ च्या घरात गोंधळ उडाला होता. सलमान खानने देखील त्या दोघांना विकेंड का वारमध्ये चांगलचं सुनावलं होत.
‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आकांक्षा पुरी असं म्हणाली कि, “त्या दिवशी मी तीन टास्क केले. जेणेकरून माझी टीम जिंकू शकेल. माझ्यासाठी जैदला किस करणं हे फक्त टास्क होते, त्यादिवशी जैदशिवाय इतरही कोणी असतं तरी मी ते टास्क केलं असतं, कारण मला टास्क जिंकायचे होते. मग ती पूजा भट्ट किंवा सायरस असता तरीही मी किस केलं असतं. मी जे केलं त्याबद्दल मला पश्चाताप नाही.”
आकांक्षा पुढे म्हणाली, “जैद किस करताना भावनांमध्ये वाहून गेला. तो मला किस करू लागला. जरी मी तसं करत नव्हते. कारण माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणतीच भावना नव्हती. यामुळे मी बॅड किसर आहे, असं तो म्हणाला. बरं, तो माझा जोडीदार नाही की मी त्याला किस करेन किंवा मला माझ्या दिग्दर्शकाने माझ्या सहकलाकाराचे किस घेण्यासही सांगितलं नाही. मी फक्त टास्क म्हणून त्याला किस केलं. पण माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलून तो स्वतःला मुर्ख दाखवत आहे.”