सध्या मनोरंजन क्षेत्रात एकाच रिअॅलिटी शोची चर्चा सुरु आहे, तो म्हणजे हिंदीतील ‘बिग बॉस १७.’ रिअॅलिटी शो कोणताही असो त्याची चर्चा तर होतेच, तशीच बिग बॉसची चर्चा घराघरांत होत असते.
या शो संबंधित चर्चा होते ती खरी स्पर्धकांमुळे. खेळ, वाद, जबाबदारी आणि खास करून त्यांचा स्वभाव, वृत्ती आणि खरेपणा यांसारख्या अनेक निकषांवर या स्पर्धकांचे शोमधील भवितव्य आधारित आहे. यंदाच्या सिझनमध्ये काही कपल सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. ही यंदाची नवखी थीम असल्यामुळे शोमध्ये आणखीनच रंजकता आली आहे.
परंतू इतके दिवस घरापासून, आपल्या प्रियजणांपासून दूर राहणे सोपे नसले तरी हे स्पर्धक हे काम करत असतात. एवढे असले तरी प्रत्येकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदलाही मिळतो, हे ही तितकेच खरे. त्यामुळे आज पाहूया की, यंदाच्या सिझनमधील सगळ्यात महागडा स्पर्धक कोण आहे आणि स्पर्धकांना नक्की किती मोबदला मिळतो.
पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अंकिता लोखंडे बिग बॉसमध्ये पाऊल टाकल्यापासून आणखीनच चर्चेत आली आहे. तसेच बिग बॉसच्या घरात जाताना तिने नेलेल्या २०० कपड्यांची देखील भारीच चर्चा रंगली होती.
In a world full of cereal, our marathi mulgi is the poha that we need 💛@jainvick @ColorsTV @BeingSalmanKhan @JioCinema @EndemolShineIND @BiggBoss #AnkitaLokhandeJain #VandanaLokhande #AnViInBiggBoss17 #Poha #Foodie #BB17 #DilDimaagAurDum #Colors #SalmanKhan #JioCinema pic.twitter.com/wTbcE8SluW
— Ankita lokhande Jain (@anky1912) October 20, 2023
अंकिता तिच्या पतीसह म्हणजेच विकी जैनसोबत या शोमध्ये सहभागी झाली आहे. माहितीनुसार, अंकिता आणि विकी हे सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येतात. कारण अंकिता आणि विकी एका आठवड्यासाठी तब्बल १२ लाख रुपये इतके मानधन आकारत आहे.
तसेच स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी या शोसाठी आठवड्याला ७ ते ८ लाख रुपये घेत आहे. तर एक्स क्राइम रिपोर्टर जिग्ना व्होरा ही सुद्धा दर आठवड्याला ७ लाख रुपये घेत आहे.
Legacy full video out now: https://t.co/rovLrmVRgS pic.twitter.com/JanbtCBlS6
— munawar faruqui (@munawar0018) October 5, 2023
Thank you @tusharramanan999 for you support
Stay connected @colorstv ..LIVE on @officialjiocinema#pressconference#salmankhan #dil #dimaag #dum#biggboss #biggboss17 #colorstv #jiocinema#jignavora #jignathewarrior #gratitude #mumbai #writer #healer #journalist #teamjigna pic.twitter.com/8IpnnXWJB4— Jigna Vora (@JignaVora5) October 21, 2023
अशा पद्धतीने मिळणारं मानधन ज्यांचं जास्त ते स्पर्धक आपले मनोरंजन करत राहणार असं चाहत्यांना वाटतंय.