अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी हा बॉलीवूड मधील अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेत्री अवनीत कौर सोबत स्क्रिन शेअर करत असलेला चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट २३ जूनला ओटीटीवर रिलीज झाला असून अभिनेत्याचा चर्चेत असणारा ‘हड्डी’ चित्रपट देखील याच वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.
नवाजुद्दिनने अलीकडेच एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्याने ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ च्या सेटवरील काही किस्से सांगितले आहेत. या मुलाखती दरम्यान त्यांला दिग्दर्शक अनुराग कश्यप खूप ओरड्ल्याचे सांगितले आहे. नवाजुद्दिन म्हणतात की, “मला तेव्हा हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते रॉबर्ट डी नीरो आणि अल पचिनो खूप आवडायचे. मी त्यांच्यासारखा वागू लागलो होतो. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’च्या सेटवर मी पहिल्याच दिवशी अल पचिनोंसारखा वागत होतो. माझे असे वर्तन पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप खूप भडकले.”
नवाजुद्दिन पुढे म्हणाले, “अनुराग यांनी मला सांगितले, ‘तू खूप अल पचिनोंसारखा वागत आहेस, जे अत्यंत चुकीचे आहे.’ त्यांचा ओरडा ऐकल्यावर मी रात्रभर झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्णपणे नवाजुद्दिन सिद्दिकी म्हणून त्यांच्यासमोर गेलो.”