श्रेयस तळपदे नेहमी काहींना काही कारणांमुळे चर्चेत असतो. मागील वर्षी पुष्पा या सिनेमाच्या हिंदी डबिंगसाठी श्रेयसने आवाज दिला होता. त्यामुळे तो चांगलाच गाजला होता. त्याच बरोबर श्रेयसची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. या मालिकेततील प्रार्थना आणि श्रेयश जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
तसेच या दोघांबरोबर या मालिकेतील सगळीच पात्रे प्रंचड गाजली होती. ही मालिका जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार होती, तेव्हा प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. परंतू प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. त्यानंतर काही दिवसानंतर या मालिकेने कायमचा प्रेक्षकांचा निरोप घेतला.
नुकतेच ‘पोस्टर बोईज २’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच झाले. यावेळी श्रेयस त्याच्या पत्नी सोबत उपस्थित होता. याचबरोबर या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी श्रेयस आणि त्याच्या पत्नीची मुलाखत घेण्यात आली. मुलाखती दरम्यान श्रेयसच्या पत्नीला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ चा दुसरा भाग पाहायला आवडेल का? असं विचारण्यात आलं.
त्यावर दिप्ती म्हणाली, “ माझी तुझी रेशीमगाठ २’ पाहायला मला नक्कीच आवडेल. याबाबत मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांना विचारलं पाहिजे की ते ही मालिका घेऊन येणार आहेत का? प्रार्थना आणि श्रेयस या दोघांची जोडी या मालिकेत खूप छान दिसली आहे. फक्त ती दोघेच नाही तर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. या सगळ्या कलाकारांची भट्टी खूप छान जमली होती. त्यामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’ सुरू झाली तर मला नक्कीच ती पहायला आवडेल.
दीप्तीचे हे बोलणे ऐकून या मालिकेचा दुसरा भाग येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.