‘किशोरी शहाणे‘ मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत सुप्रसिध्द अभिनेत्री. त्या लक्ष्मीकांत बेर्डे व महेश कोठारे यांच्या सोबत अनेक चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस. त्या सोशल मिडियावर त्यांच्या कामबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ११वी ते ग्रॅज्युएशन या काळामध्ये त्यांनी जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच दरम्यान त्यांची ओळख दीपक विज यांच्याशी झाली.
View this post on Instagram
दिग्दर्शक ‘दीपक वीज’ तेव्हा ‘हप्ता बंद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटासाठी त्यांना अत्यंत सालस व शांत अभिनेत्री हवी होती. ही भूमिका एखादी मराठी अभिनेत्रीच साकारू शकेल असा त्यांना विश्वास होता. त्यासाठी ते एका मराठी अभिनेत्रीच्या शोधात होते. अशी अभिनेत्री जी ही भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारू शकेल. हिंदी सिनेसृष्टीत काम करत असताना किशोरी शहाणे आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे ‘हप्ता बंद’ या चित्रपटासाठी जॅकी श्रॉफने दीपक यांना किशोरी शहाणे यांचे नाव सुचवले.
हे देखील वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ ’ मालिकेचा दुसरा भाग येणार?
किशोरी आणि दीपक यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आणि १९९१ साली किशोरी शहाणे यांनी दीपक वीज यांच्याशी लग्न केले.