मागील काही दिवसांपासून टेलिव्हिजन वरील सगळ्यांची आवडती मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेले अनेक महिने काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. दयाबेन मालिकेत परतणार की नाही ? हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो. रोशन सोढी तसेच काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील एका महत्वाच्या पात्राने ही मालिका सोडली. मालिकेतील तारक मेहता म्हणजेच अभिनेता शैलेश लोढा यांनी शो च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप लावून मालिकेतून एक्झिट घेतली.
हा वाद शांत झाला तोपर्यंत आता आणखी एक वाद पेटला आहे. या शोमधील आणखी एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. मालिकेत रोशन सोढी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री-बन्सीवाल हिने मालिका सोडण्याबरोबरच शोचे निर्माते असित कुमार मोदी आणि क्रू मेंबर्सवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफरने प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मेकर्सवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणावर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जेनिफर त्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इतकच नाही तर जेनिफरने शो सोडलाच नाही तर तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
या प्रकरणावर ई टाइम्सशी बोलताना असित मोदी म्हणाले की, “ती सेटवर अजिबातच नीट वागत नव्हती. ती तिच्या कामाकडे लक्ष देत नव्हती. तिच्या वागणुकीमुळे रोज प्रॉडक्शन हेडकडे तक्रार यायची. इतकंच नाही तर, शेवटच्या दिवशी तिने संपूर्ण युनिटसमोर खूप तमाशा केला. शूटिंग देखील पूर्ण केली नाही आणि सेटवर सगळ्यांना शिवीगाळ केल. तिने शोमधील संपूर्ण टीमसोबत नेहमीच गैरवर्तन केले. शूटमधून बाहेर पडताना तिने तिची कार भरधाव वेगाने चालवली आणि तिच्या मार्गात येणाऱ्या लोकांना टक्कर दिली. इतकंच नाही तर, तिने सेट वरच्या मालमत्तेचंही नुकसान केलं आहे. शूटिंगच्या वेळी त्याच्या वाईट वागणुकीमुळे आम्हाला तिचा करार रद्द करावा लागला. या घटनेच्या वेळी मी अमेरिकेत होतो”.
पुढे ते म्हणाले, “ती (जेनिफर) फक्त माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हिच माझी खरी प्रतिक्रिया आहे. मी काहीही सबबी सांगण्याचा किंवा सत्य लपवण्याचा प्रयत्न करत नाही. मी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला शोमधून आणि आमच्या टीममधून काढून टाकलं. माझे दिग्दर्शक आणि टीमने तिला शो सोडण्यास सांगितले. मी असचं काहीही बोलत नसून माझ्याकडे सर्वच पुरावे असल्याच असुन माझे प्रोडक्शन लवकरच सर्व पुरावे आणि कागदपत्र जमा करेल”.