बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपलसं करणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा व राजकीय क्षेत्रात नाव कमावणारे खासदार राघव चड्डा याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्यांचा १३ मे म्हणजेच आज साखरपुडा होणार असून या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून राघव चड्डा यांच्याकडून अनेक राजकीय मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
परिणीती बॉलिवूड मधील उत्तम अभिनेत्री असल्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे करण जोहर याच्या नावाचा सुद्धा समावेश केला जातो. तर राघव चड्डा कडून येणाऱ्या पाहुण्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची नावसुद्धा या सोहळ्यासाठी आवर्जून घेण्यात आली आहेत.
तसेच परिणीती चोप्राची बहिण म्हणजेच जिचे नाव बॉलिवूड व हॉलीवूडमध्ये अगदी आवर्जून घेतले जाते ती म्हणजे प्रियांका चोप्रा हि सुद्धा तिच्या पती व मुलीसोबत साखरपुड्यासाठी रवाना झाली आहे.
काही दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या असून आज तो क्षण अगदी जवळ आला आहे. त्यांचे चाहते सुद्धा या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. साखरपुड्याचा सोहळा हा राघव चड्डा यांच्या दिल्ली येथील कापुरथला हाउस या ठिकाणी करण्याचे आयोजिले आहे.
विशेष म्हणजे साखरपुड्याला आलेल्या अतिथींसाठी भोजनाचा मेन्यू अगदी खास असणार आहे. मात्र या मेन्यू मध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असणार आहे. हे अजूनही समोर आलेले नाही.