सध्या सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला सिनेमा म्हणजे आदिपुरुष . मंगळवार दिनांक ९ मे रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.
हैदराबादमध्ये आदिपुरुषच्या ट्रेलरचे खास स्क्रिनिंगही करण्यात आले. ट्रेलर लाँचसाठी सिनेमातील अनेक कलाकार उपस्थित होते. सिनेमातील मुख्य भूमिकेत असलेले कलाकार प्रभास आणि क्रिती या दोघांनी सिनेमातील पात्राला अनुसरून पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी मात्र क्रिती सेननने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
या खास कार्यक्रमासाठी क्रितीने ऑफ व्हाइट रंगाची, लाल व सोनेरी रंगाची काठ असलेली अतिशय सुंदर साडी नेसली होती. ही साडी अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलेली आहे. त्यांनी तयार केलेल्या या साडीवर खूपच सुंदर प्रिंट असून या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटनचे आहे.
हे देखील वाचा : Sonam Kapoor Represented India at King Charles III’s Coronation Concert
क्रितीच्या या साडीवर २४ कॅरेट सोन्याच्या खाडी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही साडी आणखीनच मौल्यवान आहे. ही साडी डबल ड्रेप असून साडीवरील कॉपर कलरचा ब्लाउजही एकदम परफेक्ट दिसतोय. यावर फुलं आणि पाचूचे देखील सुबक नक्षीकाम केल्याचे आढळते.
सुंदर साडीवर क्रितीने हातात गोल्डन ब्रेस्लेट, कानात स्तड कानातले कपाळावर छोटीशी टिकली आणि केसात गजरा माळला आहे. तसेच तिचा सिंपल मेकअप देखील खूपच उजळून आले आहे. तिचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.