साउथ इंडस्ट्री मधील अत्यंत लोकप्रिय अभिनेता रामचरण व त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्ष पूर्ण होऊन त्यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील काही दिवसांपूर्वीचं साजरा केला होता. या सगळ्यामध्ये राम चरणने त्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरून त्या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. व त्या फोटोखाली उपासना प्रेग्नंट असून ते दोघे आई-वडील होणार असल्याची माहिती दिली आहे.
रामचरण व उपासना कोनिडेला यांच्या घरात लग्नाच्या ११ वर्षांनंतर पाळणा हालला आहे. त्यांच्या घरी एका गोंडस परीचं आगमन झाल्याने ते दोघेही खूप खुश आहेत. अभिनेते चिरंजीव यांना देखील आजोबा झाल्याचं अत्यंत आनंद होत आहे. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गाने आणि बॉलिवूड व हॉलीवूडच्या कलाकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा व आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.
उपासनाची डिलिव्हरी हैद्राबाद येथील अपोलो हिल्स या रुग्णालयात झाली असून त्या रुग्णालयाच्या प्रसिधीपत्रकात असं सांगण्यात आलं कि, “उपासना कोनिडेला आणि राम चरण कोनिडेला २० जून २०२३ रोजी हैद्राबादच्या अपोलो हिल्स रुग्णालयात मुलगी झाली. डिलिव्हरीनंतर उपासना आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे.” राम चरण व उपासना हे त्यांच्या बाळासोबत आत्ता चिरंजीवी यांच्या घरी शिफ्ट होणार असून त्यांच्या बाळाला आजी-आजोबांचं प्रेम मिळाव म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीत राम चरणची पत्नी उपासनाला लग्नाच्या 11 वर्षांनी आई होण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उपासना म्हणाली, “मी खूप खुश आहे. आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला जेव्हा आई व्हावसं वाटलं तेव्हा मी आई होण्याचा निर्णय घेतला या गोष्टीवर मी खूप खुश आहे. समाजाला वाटत म्हणून मी आई होण्याचा निर्णय घेतला नाही. आताची वेळ माझ्यासाठी आणि रामसाठी सगळ्यात चांगली वेळ आणि आम्ही दोघेही अत्यंत खुश आहोत. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपल्या बाळाची देखभाल करण्यासाठी सक्षम आहोत.”