अभिनेते आशिष विद्यार्थी वयाच्या साठीत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. त्यांच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
आशिष विद्यार्थी यांना बॉलीवूडचे व्हिलन म्हणून ओळखले जाते. आशिष यांनी हिंदी चित्रपटांसह तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. यावरून आशिष विद्यार्थी किती टॅलेंटेड आहे याचा अंदाज येऊ शकतो. वयाच्या या टप्प्यावर त्यांनी पुन्हा लग्न करून चर्चेत आले आहेत. आशिष यांनी गुरुवारी रुपालीसोबत लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर आशिष म्हणाले की, “आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक खूपच खास फिलिंग आहे.” पण आशिष यांच्या पहिल्या बायकोबद्दल, ती कोण आहे आणि ती काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नामुळे पहिल्या बायकोचं मात्र हार्टब्रेक झालंय. आशिष विद्यार्थी यांची पहिली बायको राजोशी बरुआ उर्फ पिलू यांनी सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट केलीय. राजोशीने इंस्टाग्रामवर काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहून लोकांना असे वाटते की, राजोशी सध्या अशा वाईट टप्प्यातून जात आहेत. त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे.
राजोशी यांनी आशिष यांचं लग्न झाल्यावर दोन पोस्ट केल्या आहेत. राजोशी यांनी लिहिले, ‘योग्य व्यक्ती तुम्हाला प्रश्न करणार नाही की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाचे आहात. तुम्हाला ज्याचा त्रास होईल अशी कृती ते मुळीच करणार नाही हे लक्षात ठेवा.”