ज्या दिवसाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई अखेर आज लग्नबेडीत अडकले आहेत. आज म्हणजेच २ डिसेंबर, २०२२ रोजी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे पुण्यात लग्न पार पडत आहे. दरम्यान आता अक्षया आणि हार्दिकच्या लग्नातील लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यात त्यांचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
लग्नविधीच्या वेळी अक्षया आणि हार्दिक पारंपारिक वेशात पाहायला मिळाले. अक्षयाने लाल रंगाची नववारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, आंबाडा आणि गळ्यात साजेसा हार घातलेला पाहायला मिळाला. या लूकमध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तर हार्दिकने बेज रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाचे धोतर नेसले आहे, तो राजेशाही अंदाजात दिसतो आहे. त्यांच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसतेय.
View this post on Instagram
या लग्नाला अनेक कलाकार उपस्थित होते. तुझ्यात जीव रंगला, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली. त्यांनी अक्षया आणि हार्दिकसाठी एक स्पेशल परफॉर्मन्स देखील दिला आहे.
View this post on Instagram
अक्षयाने हार्दिकसाठी एक स्पेशल उखाणा देखील घेतला आहे.
View this post on Instagram