बिग बॉस मराठी या रिॲलिटी शोमधून अनेक कलाकार महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. तर याच शोच्या चौथ्या पर्वातून अभिनेता ‘प्रसाद जवादे (Prasad Jawade)’ देखील चांगलाच लोकप्रिय झाला. तर या शो व्यतिरिक्त अरुंधती, कुलस्वामिनी, असे हे कन्यादान या मालिकांमध्येही तो झळकला आहे.
परंतू बिग बॉसमुळे प्रसाद चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासून प्रसाद अभिनय करताना कधी दिसणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झालीही होती. काही दिवसांपूर्वी प्रसाद काव्यांजली या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतू त्याने अचानक केलेल्या लग्नाच्या घोषणेने साऱ्यांना आनंदाचा धक्काच बसला. बहुतेक लग्नाच्या गडबडीमुळे प्रसादने काव्यांजली मालिका अवघ्या काहीच दिवसांत सोडली. त्यामुळे काही दिवसांपासून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
१८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुखसोबत लग्नगाठ बांधली. खूपच थाटामाटात त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील मेहंदीचे, हळदीचे, संगीताचे आणि सप्तपदीचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी प्रसाद आणि अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर लग्नानंतर आता ते दोघेही पुन्हा त्यांचं कामावर रुजू झाले आहेत. अमृताने सुद्धा लगेचच तिच्या नाटकाचे प्रयोग सुरु केले. अमृता सध्या तिच्या नियम व अटी लागू या नाटकाच्या प्रयोगाला आणि निरनिराळ्या ठिकाणी प्रयोगाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे प्रसादने देखील त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रसाद आता कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या मालिका किंवा सिनेमात दिसणार हे यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते. आता लवकरच प्रसाद झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. त्यानुसार अभिनेत्री मुग्धा कर्णिक मुख्य भूमिकेत आहे. तर प्रसाद त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रसाद एका कर्तबगार मुलाच्या भूमिकेत असून त्याच्या पात्राचे नाव समर असे आहे. प्रोमोमध्ये समर म्हणजेच प्रसादची एन्ट्री एकदम डॅशिंग पद्धतीने झाली आहे. त्यामुळे त्याने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तर आता या मालिकेत प्रसादला पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.