बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
आलिया दुपारच्या वेळेस तिच्या लिव्हिंग रुममध्ये आराम करताना कोणीतरी आपल्याला बघत आहे असे तिला जाणवले तेव्हा तिने सर्वत्र नजर फिरवली असता शेजारच्या इमारतीच्या छतावर दोन व्यक्ती हातात कॅमेरे घेऊन दिसले.
आलियाने तिच्या इंस्टग्रामवर स्टोरी शेअर करत तिचे ते फोटो व्हायरल करणाऱ्या पोर्टला टॅग करत त्यांना चांगलच सुनावलं. या फोटोमध्ये ती लिव्हिंग रुममध्ये बसलेली दिसत आहे. तिचा हा घरातील फोटो काढताना कोणतीही परवानगी घेतली नव्हती. गुपचूप काढलेल्या या फोटोमुळे आलिया चांगलीच संतापली आहे.
सध्या आलियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर याप्रकरणी आलियाने तिच्या स्टोरीमध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केल्यामुळे पोलिसही आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आता आलियाचे गुपचूप फोटो क्लिक करणाऱ्यांविरोधात पोलिस काय कारवाई करतील हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या पोलिस याप्रकरणी आलियाच्या संपर्कात आहेत.
आलियाने पापाराझींना खडेबोल सुनावत म्हणाली की, “एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत योग्य आहे? गोपनीयतेचे उल्लंघन करण्याची हद्द झाली. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. पण तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, असंच म्हणावं लागेल.”
तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूर यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत.