मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे.
प्रार्थना अनेक सिनेमांतून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचा भला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टीव असते. ती कायमच आपल्या चाहत्यांनासोबत तिच्या खासगी आणि व्यवहारिक आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. तसेच तिचे नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओ कायम चर्चेत असतात.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती नुकतीच दिसली होती. यामध्ये प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे या दोघांना स्क्रीनवर एकत्र पाहताना प्रेक्षकांना मात्र फारच आवडले. या मालिकेमुळे या दोघांचं नातं आणखीनच घट्ट झालं हे नक्की. तर पुष्पा या हिंदी सिनेमासाठी आपला आवाज देणारा श्रेयस आता पुन्हा एकदा त्याच्या पुष्पा स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा : या व्यक्तीमुळे होऊ शकले नाही पूजा भट्ट आणि सोहेल खानचे लग्न…
प्रार्थना बेहरेने तिच्या इंस्टाग्रामवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती आणि तिच्या फोटोवर कमेंट करणारा श्रेयस आता सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली एकदम बोल्ड लूकमधील प्रार्थना दिसत आहे. त्यामुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहे तर काही तिला ट्रोल देखील करत आहे.
पण श्रेयसने हा फोटो लाईक करत कमेंटमध्ये लिहिले की, “फ्लॉवर समझे क्या.. फायर हैं मॅडम!” तर त्याच्या या कमेंटवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.